ग्रामपंचायत टोकावडे बद्दल

ग्रामपंचायत टोकावडे (आ.पो. टोकावडे, ता. मुरबाड, जि. ठाणे) ही मुरबाड तालुक्यातील एक विकसित व लोककेंद्रित ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत टोकावडेची एकूण लोकसंख्या सुमारे १५२५ असून सुमारे ५०२ कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. गावातील साक्षरतेचे प्रमाण अंदाजे ९०% आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतीबरोबरच विविध शासकीय व खाजगी सेवांमधून उपजीविकेची साधने उपलब्ध आहेत.

ग्रामपंचायत टोकावडे हे परिसरातील एक महत्त्वाचे केंद्र असून येथे नागरिकांसाठी बहुसंख्य शासकीय व नागरी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. यामुळे टोकावडे गाव हे आजूबाजूच्या गावांसाठीही सेवा-केंद्र म्हणून ओळखले जाते.

🏛️ प्रशासकीय रचना

ग्रामपंचायत टोकावडे ही मुरबाड तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण १० सदस्य कार्यरत असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित सभा व ग्रामसभांचे आयोजन केले जाते.

सध्या ग्रामपंचायत टोकावडेच्या सरपंचपदावर श्रीमती. हिराबाई गोटीराम हिलम (मो. ८०१००३२०४२) कार्यरत असून उपसरपंचपदावर श्री. राहुल बालकृष्ण पवार (मो. ९२७२५६३४७७) आहेत. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती. मीनल राजेश साबळे (मो. ९८२०३७२०२५) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले जाते. ग्रामपंचायत कार्यालयामार्फत नागरिकांना विविध शासकीय सेवा व प्रमाणपत्रे पुरविली जातात.

सदस्य

ग्रामपंचायत पत्ता व संपर्क माहिती

ग्रामपंचायत टोकावडे
At. Post. टोकावडे,
Tal. मुरबाड, Dist. ठाणे

📧 ई-मेल: grampanchayattokawade@gmail.com

📞 सरपंच: श्रीमती. हिराबाई गोटीराम हिलम – ८०१००३२०४२
📞 उपसरपंच: श्री. राहुल बालकृष्ण पवार – ९२७२५६३४७७
📞 ग्रामपंचायत अधिकारी: श्रीमती. मीनल राजेश साबळे – ९८२०३७२०२५

ग्रामपंचायत सदस्यांची माहिती

ग्रामपंचायत टोकावडे मध्ये एकूण १० सदस्य कार्यरत असून सर्व सदस्य गावाच्या विकासासाठी सक्रिय आहेत.

ग्रामपंचायत सदस्य:
राहुल बालकृष्ण पवार, काशिनाथ नामदेव हिलम, नीता काशिनाथ हिलम, सज्जला सुरेश कोयते, विलास लाशा हिलम, विलास रघुनाथ घोलप, माधुरी संतोष हिलम, सोनम विष्णू हिलम, सपना समीर कोयते.

ही सर्व सदस्य मंडळी ग्रामपंचायतीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत असून पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व स्वच्छतेच्या कामांवर सातत्याने लक्ष ठेवले जाते.

ग्रामपंचायत आढावा

📊 मूलभूत माहिती

राज्य: महाराष्ट्र
जिल्हा: ठाणे
तालुका: मुरबाड
गाव: टोकावडे
LGD कोड: 192287

लोकसंख्या:
➡️ एकूण: 1525
➡️ पुरुष: 807
➡️ महिला: 718

घरे: 502
साक्षरता दर: 90%
क्षेत्रफळ: 349.44 हेक्टर


📍 पत्ता व संपर्क

पत्ता:
At. Post. टोकावडे, ता. मुरबाड, जि. ठाणे

📧 ई-मेल:
grampanchayattokawade@gmail.com
minalrajsable@gmail.com

📞 संपर्क:
• 9820372025


👤 पदाधिकारी व अधिकारी

सरपंच:
श्रीमती. हिराबाई गोतीराम हिलम
📞 8010032042

उपसरपंच:
श्री. राहुल बाळकृष्ण पवार
📞 9272563477

ग्रामपंचायत अधिकारी: मिनल राजेश साबळे
📞 9820372025


🏫 शिक्षण व अंगणवाडी

शाळा:

  1. जि.प. केंद्र शाळा टोकावडे
    UDISE: 27210916401
    मुख्याध्यापक: भारती योगेंद्र चौधरी
    📞 8087688237
  2. जि.प. शाळा मानिवली (घो.)
    UDISE: 27210916901
    मुख्याध्यापक: भारती भागवत पवार
    📞 9273892134

एकूण:
• प्राथमिक शाळा: 2
• माध्यमिक शाळा: 1
• उच्च माध्यमिक: 1
• अंगणवाडी केंद्र: 3


🏢 उपलब्ध सुविधा

• ग्रामपंचायत भवन
• शाळा व अंगणवाडी
• ग्रामीण रुग्णालय
• पशुवैद्यकीय दवाखाना
• पाणीपुरवठा योजना
• इंटरनेट सुविधा
• डिजिटल सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र)
• बँक व ATM
• पोलिस स्टेशन
• व्यायामशाळा
• इतर शासकीय कार्यालय
• माध्यमिक विद्यालय व महाविद्यालय

➡️ सर्व सुविधा नागरिकांसाठी चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत.


🌾 अर्थव्यवस्था

• मुख्य व्यवसाय: शेती


💰 आर्थिक माहिती

➡️ वार्षिक उत्पन्न: ₹ 5,38,132/-

खर्चाचे प्रमुख विभाग:
• प्रशासन
• आरोग्य व शिक्षण
• स्वच्छता व पाणीपुरवठा
• सार्वजनिक दिवाबत्ती
• महिला व बालकल्याण (10%)
• मागासवर्गीय कल्याण (15%)
• दिव्यांग कल्याण (5%)
• रस्ते व गटारे
• सांस्कृतिक कार्यक्रम


🚧 योजना व प्रकल्प

• जनसुविधा योजना

राज्य / केंद्र योजना:
• स्वच्छ भारत अभियान
• प्रधानमंत्री आवास योजना
• जन मन योजना
• आदिम घरकुल योजना
• शबरी आवास योजना


🛕 धार्मिक स्थळे

• एकलेशाई मंदिर


🎉 सण व परंपरा

• गणेश उत्सव


👩‍👩‍👧 सामाजिक उपक्रम

• सावित्रीबाई फुले ग्रामसंघ


🧾 नागरिक सेवा

• जन्म / मृत्यू / विवाह प्रमाणपत्र
• दारिद्र्य रेषा दाखला
• हयातीचा दाखला
• नमुना नंबर 8 उतारा
• विविध शासकीय योजना अर्ज
• मनरेगा नोंदणी
• घरकुल / नळजोडणी अर्ज


🏗️ पायाभूत सुविधा (eGramSwaraj अनुसार)

• नळ पाणी जोडणी: 150 कुटुंब
• घरगुती शौचालय: 329
• पिण्याचे पाणी स्रोत: 6
• बँका: 2
• ATM: 1
• CSC केंद्र: 1
• घनकचरा व्यवस्थापन: 1


🏘️ समाविष्ट गावे

• टोकावडे
• मानिवली 


⏰ कार्यालयीन वेळ

सकाळी 9:45 ते सायं 6:15

योजना व प्रमुख कार्ये

कामगिरी व विकास उपक्रम

मुरबाड पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे

दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे

मुरबाड पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.

03

Super power Administration

Digitalization of all Gram Panchayat services

Health & Education

Improved education and healthcare access in rural areas

Entrepreneurship

Women entrepreneurship and youth skill development

Together, we aim to make every village model of cleanliness, digital governance, and sustainable development

Murbad Panchayat Samiti