ग्रामपंचायत टोकावडे (आ.पो. टोकावडे, ता. मुरबाड, जि. ठाणे) ही मुरबाड तालुक्यातील एक विकसित व लोककेंद्रित ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत टोकावडेची एकूण लोकसंख्या सुमारे १५२५ असून सुमारे ५०२ कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. गावातील साक्षरतेचे प्रमाण अंदाजे ९०% आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतीबरोबरच विविध शासकीय व खाजगी सेवांमधून उपजीविकेची साधने उपलब्ध आहेत.
ग्रामपंचायत टोकावडे हे परिसरातील एक महत्त्वाचे केंद्र असून येथे नागरिकांसाठी बहुसंख्य शासकीय व नागरी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. यामुळे टोकावडे गाव हे आजूबाजूच्या गावांसाठीही सेवा-केंद्र म्हणून ओळखले जाते.
ग्रामपंचायत टोकावडे ही मुरबाड तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण १० सदस्य कार्यरत असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित सभा व ग्रामसभांचे आयोजन केले जाते.
सध्या ग्रामपंचायत टोकावडेच्या सरपंचपदावर श्रीमती. हिराबाई गोटीराम हिलम (मो. ८०१००३२०४२) कार्यरत असून उपसरपंचपदावर श्री. राहुल बालकृष्ण पवार (मो. ९२७२५६३४७७) आहेत. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती. मीनल राजेश साबळे (मो. ९८२०३७२०२५) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले जाते. ग्रामपंचायत कार्यालयामार्फत नागरिकांना विविध शासकीय सेवा व प्रमाणपत्रे पुरविली जातात.
गटविकास अधिकारी (BDO)
ग्रामपंचायत अधिकारी
सरपंच
उपसरपंच
ग्रामपंचायत टोकावडे
At. Post. टोकावडे,
Tal. मुरबाड, Dist. ठाणे
📧 ई-मेल: grampanchayattokawade@gmail.com
📞 सरपंच: श्रीमती. हिराबाई गोटीराम हिलम – ८०१००३२०४२
📞 उपसरपंच: श्री. राहुल बालकृष्ण पवार – ९२७२५६३४७७
📞 ग्रामपंचायत अधिकारी: श्रीमती. मीनल राजेश साबळे – ९८२०३७२०२५
ग्रामपंचायत टोकावडे मध्ये एकूण १० सदस्य कार्यरत असून सर्व सदस्य गावाच्या विकासासाठी सक्रिय आहेत.
ग्रामपंचायत सदस्य:
राहुल बालकृष्ण पवार, काशिनाथ नामदेव हिलम, नीता काशिनाथ हिलम, सज्जला सुरेश कोयते, विलास लाशा हिलम, विलास रघुनाथ घोलप, माधुरी संतोष हिलम, सोनम विष्णू हिलम, सपना समीर कोयते.
ही सर्व सदस्य मंडळी ग्रामपंचायतीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत असून पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व स्वच्छतेच्या कामांवर सातत्याने लक्ष ठेवले जाते.
ग्रामपंचायत टोकावडे अंतर्गत नागरिकांसाठी विविध शासकीय व नागरी सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये ग्रामपंचायत भवन, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना, पाणीपुरवठा योजना, इंटरनेट सुविधा, डिजिटल सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र), बँक, पोलीस स्टेशन, व्यायामशाळा, माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. वरील सर्व कार्यालयांमार्फत जनसेवा प्रभावीपणे व सुयोग्य प्रकारे उपलब्ध करून दिली जाते.
ग्रामपंचायत टोकावडे अंतर्गत एकूण २ जिल्हा परिषद शाळा कार्यरत आहेत.
जिल्हा परिषद केंद्र शाळा, टोकावडे
UDISE क्रमांक: 27210916401
मुख्याध्यापिका: सौ. भारती योगेंद्र चौधरी
संपर्क: ८०८७६८८२३७
जिल्हा परिषद शाळा, मानिवली (घो.)
UDISE क्रमांक: 27210916901
मुख्याध्यापिका: सौ. भारती भागवत पवार
संपर्क: ९२७३८९२१३४
ग्रामपंचायत टोकावडे अंतर्गत स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, जन मन योजना, आदिम घरकुल योजना, शबरी आवास योजना अशा विविध शासकीय योजना राबविण्यात येत आहेत. तसेच जनसुविधा योजना अंतर्गत गावातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यात येत आहेत.
ग्रामपंचायतीचा वार्षिक निधी सुमारे ₹५,३८,१३२/- असून तो प्रशासकीय खर्च, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती, दिव्यांग कल्याण (५%), महिला व बालकल्याण (१०%), मागासवर्गीय कल्याण (१५%), रस्ते, गटारे व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरण्यात येतो.
ग्रामपंचायत टोकावडे मध्ये एकलेशाई मंदिर हे प्रमुख धार्मिक स्थळ असून गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गावातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण सुसंस्कृत व एकोप्याचे आहे.
महिला सक्षमीकरणासाठी सावित्रीबाई फुले ग्रामसंघ कार्यरत असून महिलांच्या सामाजिक व आर्थिक सशक्तीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
मुरबाड पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे
मुरबाड पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.
अलीकडील बातमी
मुरबाड पंचायत समिती